महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान

@maharashtracity

मुंबई: उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील  सिडकुल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. 

यावेळी उत्तराखंडचे उद्योगमंत्री चंदन राम दास, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व  सिडकुल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ हरिन्द्र कुमार गर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तराखंड (Uttrakhand) येथे माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, नैसर्गिक उत्पादने या क्षेत्रात फार मोठा वाव आहे. धार्मिक पर्यटनाशिवाय उत्तराखंड येथे साहसी पर्यटनासाठी देखील महाराष्ट्रातून (Maharashtra) अनेक लोक जातात. महाराष्ट्रातील उद्योजकांनी अधिक यशस्वी व्हावे व उत्तराखंडला देखील औद्योगिक दृष्ट्या पुढे येण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी यावेळी केले. 

सामंजस्य करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उत्तराखंड राज्याने उद्योग व्यापारासाठी एक खिडकी योजना लागू केली असून उद्योग वाढीसाठी लँड बँक तयार करण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे मंत्री चंदन राम दास यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योगांनी उत्तराखंडच्या पहाडी भागात उद्योग सुरु केले तर तेथील लोकांचे स्थलांतर कमी होईल व त्यांना रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले. 

उत्तराखंड येथे पर्यटन, वेलनेस, प्राकृतिक उत्पादने, औषधी निर्माण, आदरातिथ्य या क्षेत्रात विशेष संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर लवकरच उत्तराखंड येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करेल तसेच चेंबरतर्फे आयोजित मुंबई येथील व्यापार प्रदर्शनाला उत्तराखंड येथील उद्योगांना निमंत्रित करेल, असे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here