@maharashtracity

कोकणपट्ट्यात आणि मध्य महाराष्ट्रात आगामी दोन दिवस पावसाचे

मुंबई

पूर्व मध्य बंगाल उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतरण झाले असून आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीवर धडकणार आहे. (High alert of Gulab Cyclone in Andhra Pradesh and Odisha)

भारतीय हवामान विभागाकडून ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला असून मध्य महाराष्ट्र, कोकण पट्टा, गोवासारख्या तटीय भागात आगामी दोन दिवस पावसाचा तडाखा बसणार आहे.

सायंकाळपर्यंत पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात ०७ ताशी वेगाने हे चक्रीवादळ निर्माण झाले. आंध्र प्रदेश राज्याच्या उत्तर पश्चिम भागाकडे तर २६ सप्टेंबर रोजी ओडिशाच्या कलांगपट्टाम आणि गोपाळपूरकडे वळणार आहे. याचा महाराष्ट्राच्या मध्य, तसेच किनारपट्टीय प्रदेशात परिणाम जाणवणार आहे.

वाऱ्याचा वेग आणि पावसाची तीव्रता वाढलेली दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने हवामान वृत्त जारी करत याबद्दल माहिती दिली. २६ सप्टेंबर रविवारी सायंकाळी कमी दाबाचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाला गुल आब म्हणजेच गुलाब असं संबोधण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here