@maharashtracity
धुळे: महानगर पालिकेतील (Municipal Corporation) विविध आस्थापनेवर असलेल्या ठेकेदारी व रोजंदारी कर्मचार्यांचे (Daily wages workers) प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने (BMS) शुक्रवारी मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले.
याबाबत मजदूर संघाने आयुक्तांसह महापौरांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की महापालिका क्षेत्रात मलेरिया विभागांतर्गत औषध वाटप करण्यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी पाच वर्षाहून अधिक काळ सेवा देत असल्याने त्यांना प्रभागातील घरे तसेच आयबीटी औषधाचे प्रमाण माहिती असल्याने त्यांना नवीन ठेकेदाराने कायम करणे गरजेचे होते. मात्र यातील जुन्या कामगारांना काढून नविन कामगार भरले जाणार असल्याने जुन्या कामगारांवर अन्याय झाला आहे. त्यांना पुर्ववत कामाला घ्यावे.
ठेकेदारी पध्दतीवर काम करणार्या कामगारांना किमान वेतन मिळावे. आरोग्य विभागातील कामगारांना कायम करावे, अशी मागणी मजदूर संघाने केली आहे. या धरणे आंदोलनात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे, घनशाम जोशी, बी.एन.कुळकर्णी, बी.एन.पाटील, गुलाब भामरे, लोटन मिस्तरी, हरी धुर्मेकर, महिला आघाडीच्या संगिता चौधरी, सोनाली बागुल, रियाज पठाण आदींसह पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.