By संतोष मासोळे

@maharashtracity

धुळे: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली भयावह स्थिती आणि वाढलेला मृत्युदर यामुळेच ‘ब्रेक द चेन “(break the chain) हे सूत्र आपोआपच अमलात आले आणि उत्तर महाराष्ट्रातली (North Maharashtra) लाट ओसरली. यास प्राणवायूसह (oxygen) पुरेशा वैद्यकीय सुविधेचा आधार मिळाला.अशी माहिती येथील कै.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis)  रुग्णांसाठी अद्ययावत अशा १०० खाटा आणि लहान मुलांवरील संभाव्य आजारावर उपचार म्हणून पूर्ण झालेली पूर्वतयारी हेही संभाव्य धोक्याला पायबंद घालू शकेल असे डॉ.सूर्यवंशी म्हणाले.

कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक (Nashik) विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत आठ लाख ७८ हजार ७३२ रुग्णांपैकी आठ लाख ४८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सद्यस्थितीत १७ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात बारा हजार ४२५ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे, तर मृत्युदर १.४२ टक्के इतका आहे.अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३९ लाख ८७ हजार ८०४ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी आठ लाख ७८ हजार ७३२ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य डॉ. गंडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत तीन लाख ८८ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तीन लाख ७६ हजार ८९६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सहा हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्के इतके आहे. आजपर्यंत चार हजार ९१७ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२६ टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख ६७ हजार ०८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोन लाख ५६ हजार ६७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सहा हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के इतका आहे. आजपर्यंत तीन हजार ४४३ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२८ टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के

धुळे (Dhule) जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ हजार १०० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६६ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.

जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के

जळगांव (Jalgaon) जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ४० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एक लाख ३४ हजार ७६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच तीन हजार ४१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के इतका आहे. आजपर्यंत दोन हजार ५५० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ हजार ८६० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८४९ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here