@maharashtracity

मुंबई: कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत गोराई येथील ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा ६ डिसेंबर रोजी ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी गोराई येथील ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात.

मात्र, मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविड -१९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यातच कोविडच्या नवीन विषाणूमुळे अवघे जग धास्तावले आहे. त्यामुळे अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ (Global Pagoda) येथे येऊ नये. कोविडचा ओमिक्रॉन या नवीन विषाणू प्रजातीला (Omicron) संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या पालिका (BMC) यंत्रणेच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.

Also Read: ९ परदेशी प्रवाशी कोविड पॉझिटिव्ह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या ‘आर मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर / मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त हफीज वकार जावेद मन्सुर अली, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधीत पोलिस निरिक्षक रविंद्र आव्हाड, पोलिस उप निरिक्षक (वाहतूक) संजय सावंत, विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधीत अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here