Twitter : @NalavadeAnant

मुंबई

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. 

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नासंदर्भात सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाकडील निधीचा आढावा घेतला जाईल. या मंडळाकडे निधी उपलब्ध असल्यास त्यातून दुरुस्तीची कामे करण्यात येतील. मात्र निधीची कमतरता असल्यास पुढील डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here