@maharashtracity

महाड (रायगड): महाड शहर हे व्यापारी बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या बहुतांशी गावातील नागरिक बाजारपेठेसाठी महाड शहरात येत असतात. रशिया – युक्रेन (Russia – Ukraine war) या देशातील युद्धाचे कारण सांगून महाडमधील व्यापाऱ्यांनी खाद्यतेल (edible oil) महाग केले आहे. तसेच महाड शहरानजीक असणाऱ्या पेट्रोल पंप चालकांनी देखील पेट्रोल व डिझेलची (Petrol and Diesel) कृत्रिम टंचाई दाखवून वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय केली आहे. याबाबत प्रशासन यंत्रणा सुस्त आहे.

महाड (Mahad) शहरात व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक (hoarding of edible oil) केली असून किरकोळ ग्राहकांना मात्र खाद्यतेलाचा तुटवडा असल्याचे कारण सांगून वाढीव दराने ग्राहकांना तेलाचा पुरवठा करीत आहेत. तहसील कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय यांना मात्र याची सुतराम कल्पना नाही. व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल यंत्रणा व पुरवठा विभाग दाखवत नाही.

त्याचबरोबर शहरातील ५ पेट्रोल पंप धारकांनी देखील इंधन पुरवठा होत नसल्याचे कारण दाखवून पेट्रोल पंपावर कृत्रिम इंधनाचा तुटवडा निर्माण केला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाडमधील पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनीदेखील पेट्रोलचे दर वाढण्यापूर्वी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धावा घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here