By Anant Nalwade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष दानवे, अतुल भातखळकर आणि सुलभा खोडके यांनी राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्यांऐवजी थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

चव्हाण म्हणाले की, राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे.गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता दर महिना प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्क्म लाभार्थींच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here