@maharashtracity

टास्क फोर्स तज्ज्ञांकडून बुस्टर डोस व लहानग्यांच्या लसीकरणाचे स्वागत

मुंबई: गेले २१ महिने उच्छाद मांडलेल्या कोरोनाच्या महामारी (corona pandemic) विरोधात लसीकरणाचे महत्वाचे साधन असून त्यात उत्परिवर्तन होऊन येणारे नवनवीन वेरियंटच्या विरोधातही लसीकरण (vaccination) काम करत आहे. लस घेतलेल्यांना बाधा झाली असली तरीही गंभीर परिणाम समोर येत नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे, फ्रंटलाईन वर्करच्या (front line workers) बूस्टर डोस देण्याबाबतच्या निर्णयाचे कोरोना टास्क फोर्स (Corona Task Force) तज्ज्ञांकडून स्वागतच होत आहे.

यावर बोलताना कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित (Dr Rahul Pandit) यांनी सांगितले की, उत्परिवर्तन करणाऱ्या कोविड१९ विषाणूशी (Covid – 19) लढण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय झाला आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण करण्याचे ठरविले आहे.

त्याचवेळी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यासाठी (Health workers) तसेच फ्रंटलाईन वर्करसाठी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी रुग्णांसाठी बूस्टरची घोषणा शनिवारी करण्यात आली. हे अधिक महत्वाचा निर्णय आहे. कारण संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल आहे.

त्याचवेळी ओमिक्रॉनसारख्या (omicron) कोविड १९ प्रकारातील वेरियंट प्रकरणांची वाढती संख्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. अशा वेरियंटचा प्रसार कमी करावयाचा असल्यास लसीकरण उपयोग पडत आहे. या वेरियंटचा प्रभाव लसीकरणाने कमी होऊ शकतो. असे आकडेवारीवरुन समोर येत आहे.

हे सर्व समजून येत असताना सामान्य नागरिकांनी आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी त्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची बाबही ध्यानात घेणे आवश्यक असल्याचे डॉ. पंडित म्हणाले. अद्याप लस टोचून न घेतल्यास दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना आणि त्याच्या वेरियंटबाबत सावधगिरी महत्वाची असून सणांच्या वेळी सर्व कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन करणे महत्वाचे आहे. जोपर्यंत आपण कोविड-१९ वर विजय मिळवत नाही तोपर्यंत घरातील जागेत डबल मास्किंग आणि चांगले हवेचे वेंटिलेशन (ventilation) ही गुरुकिल्ली असल्याचे डॉ. पंडित यांनी अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here