@maharashtracity
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे सूचक वक्तव्य
मुंबई: सध्या ओमिक्रोन व्हेरियंटमुळे सर्व जग ढवळून निघाले असताना महाराष्ट्रात देखील एक रूग्ण ओमिक्रोनचा आढळला आहे. त्यामुळे काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही तिसरी लाट ओमिक्रोन व्हेरियंटची असू शकते, असा गंभीर इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना (Jalna) येथे दिला.
यावेळी त्यांनी सद्यस्थितीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, कोरोना (corona) नियमांचं पालन करण्याचं टोपे यांनी आवाहन केले. मात्र, आता सध्या निर्बंध न लावण्याची टोपे यांनी केंद्राला विनंती केली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि कोविड वर्तणूक यांचे पालन आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यातील लसीकारणाचा (vaccination) वेग वाढला असून राज्यातील बहुतांश जनतेने एक तरी लस घेतली आहे. शिवाय लसीचा साठा देखील मुबलक असून लसीकरणाचे वेगाने सुरु आहे. दरम्यान दोन डोस झाल्यानं बूस्टर डोस (booster dose) बाबतचा विचार करणे आवश्यक आहे. यात ही 45 वयावरील नागरिकांना बूस्टर डोस द्यावा असं ठरत आहे. मात्र बुस्टर डोससाठी केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा असे ही राजेश टोपे यावेळी म्हणाले.