@maharashtracity
धुळे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ईद-ए-मिलाद साधेपणानेच साजरा होणार आहे. (No procession on Eid E Milad)
नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांनीही हा सण जिल्ह्यात शांततेत, आनंद व खेळीमेळीने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच केवळ सण-उत्सवातच नव्हे तर वर्षभर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास शहरात कायमस्वरुपी शांततेसह चांगले विधायक काम साध्य करु शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मिरवणूक न काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ए-मिलादनिमित्त शांतता समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, सण-उत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकाने सजग रहावे, जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन अतिशय चांगला पध्दतीने, आनंद व खेळीमेळीत सगळ्यांच्या सहकार्याने कसा साजरा होईल, यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. शिवाय शासनाच्या निर्बंधाचे पालन करत प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले.