इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनोकॉलॉजी अँड ऍब्स्टेट्रिक्समध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांचे निरीक्षण अहवाल

@maharashtracity

मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) लाटेच्या दरम्यान लक्षणे असलेल्या कोविड१९ ग्रस्त गर्भवती महिलांचे प्रमाण जास्त असले तरी रोग आणि मृत्यूची तीव्रता डेल्टा आणि डेल्टा लाटेच्या तुलनेत कमी होती. तसेच आधीच्या दोन लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉन लाटेदरम्यान मुदतपूर्व जन्मदर प्रति १००० जन्मदर कमी होता.

प्री-डेल्टा आणि डेल्टा लाटेच्या तुलनेत ओमिक्रॉन लाटे दरम्यान प्रति १००० जन्मांमध्ये गर्भपाताचे प्रमाण जास्त होते. तर ओमिक्रॉन लाटेत डेल्टा वेव्हच्या तुलनेत गर्भावस्थेतील मधुमेह मेलीटस कमी होता.

पूर्वीच्या दोन लाटांमध्ये तुलनेत ओमिक्रॉन लाटेदरम्यान एक्लॅम्पसिया जास्त असल्याचे नोंदवले गेले असे मुख्य अन्वेषक डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले.

दरम्यान मुंबईतील डेल्टा आणि डेल्टा लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉन लाटेत कोविड१९ रोगाच्या तीव्रतेत घट झाली. त्यामुळे या लाटेत मातामृत्यूचे प्रमाण कमी होते.

आयसीएमआर एनआयआरआरसीएच आणि नायर हॉस्पिटलच्या प्रेग कोविड नोंदणी टीमने कोविड१९ च्या प्रीडेल्टा, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट लाटांच्या दरम्यान नायर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या २०५८ कोविड१९ पॉझिटिव्ह गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांच्या डेटाचे विश्लेषणात्मक अहवाल सादर केला. हा अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्समध्ये पकाशित करण्यात आला.

प्रीडेल्टा आणि डेल्टा लाटांच्या तुलनेत ओमिक्रॉन लाटेदरम्यान गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांमध्ये संसर्गाच्या प्रभावावर सात प्रमुख फरक नोंदवले. पूर्वीच्या दोन लहरींच्या तुलनेत ओमिक्रॉन लाटेत तरुण स्त्रियांना जास्त त्रास झाला असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.

दरम्यान कोविड१९ रोगाची तीव्रता कमी झाल्याचे स्पष्टीकरण या वस्तुस्थितीवरून स्पष्ट केले जाऊ शकते की ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गापर्यंत मर्यादित असल्याने कोविडची तीव्रता कमी होणे आणि उच्च लक्षणात्मक प्रकरणांसाठी जबाबदार घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक डेटा आवश्यक असल्याचे प्रबंधकाच्या सहलेखिका डॉ. गीतांजली सचदेवा( Dr gitanjali sachdeva) यांनी सांगितले.

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना कोविडची लस घेणे आणि स्वतःचे आणि त्यांच्या बाळांचे संरक्षण करणे यावर नियंत्रण आले. कोविड लसीकरण गंभीर आजार टाळण्यासाठी आणि मृत्यू आणि गर्भधारणेच्या गुंतागुंत कमी करण्यात मदत करण्यासाठी सिद्ध झाले आहे.

जुलै २०२१ पासून भारतातील गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला कोविड लसीकरणासाठी पात्र आहेत आणि त्यांना कोविड लस घेण्याचे समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माजी संचालक डॉ. स्मिता महाले यांनी मांडले. या अभ्यासात योगदान देणाऱ्या इतर संशोधकांमध्ये बीवायएल नायर हॉस्पिटलमधीलश्वेता केसरवाणी, चेतना साळुंके, पद्मजा कुंभार, पियुषा येनकुरे, जुवैरिया शेख, श्रुतिका शिखरे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here