By अनंत नलावडे
Twitter: @nalavadeanant
मुंबई: ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र आणि पॅरॉनॉर्मलशास्त्राचे अभ्यासक डॉ. तुषार सावडावकर यांना अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमात ‘मुंबई भूषण पुरस्कारा”ने गौरविण्यात आले. ‘अल्टर्नेटीव्ह मेडिसिन ‘ या विषयात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळालेल्या डॉ. सावडावकर यांनी कोरोना काळात विविध फ्रिक्वेन्सी तंत्राचा वापर करून रुग्णांना नव्या उपचार पद्धतीने दिलासा दिला.
सध्या डॉ. सावडावकर हे ‘बायोजॉमेट्री रेडीऑनिक्स हिलिंग’ या क्षेत्रात संशोधन करत आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्र विषयातील कार्याची दखल घेऊन पुण्यातील ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनच्या वतीने डॉ. सावडावकर यांचा सन्मान केला.