@maharashtracity

परीक्षा सुरळीतच आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील (Department of Public Health) गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदांसाठी लेखी परिक्षा ( Written Test) राज्यातील १३६४ केंद्रांवर रविवारी घेण्यात आली. या परिक्षेत ही पाच जिल्ह्यातील परिक्षा केंद्रामध्ये पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

मात्र राज्यातील आरोग्य विभागातील ( State Department of Health ) परिक्षा सुरळीतच पार पडल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील ( Director of Health Dr. Archana Patil) यांनी दिली. राज्यभरातून ४,६१,४९७ उमेदवारी अर्ज आले होते. यातील ४१२२०० उमेदवारांना परिक्षा प्रवेशपत्र देण्यात आले.

दरम्यान चंद्रपूर ( Chadrapur) , भंडारा ( Bhandara) , अकोला ( Akola) , मुंबई ( Mumbai) व ठाणे ( Thane) जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परिक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते.

त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल.

वरील केंद्रांवर उमेदवारानां सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी ( Mohadi) , जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परिक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

बीड ( Beed) येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे ( Modern electronic equipment ) परिक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीसांनी ( Police) वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here