@maharashtracity

मुंबई: गणेशोत्सव निर्विघ्नपणे संपन्न झाल्यावर मुंबईला आता नवरात्रीचे (Navaratri) वेध लागले आहेत. कोविडच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डोंबिवलीत या वर्षी “नमो रमो नवरात्री” चा आवाज पुन्हा घुमणार आहे.

नमो रमो नवरात्रीचे (Namo Ramo Navaratri) हे चवथे वर्ष असून यंदाचा गरबा राज्यातील सर्वात मोठा असा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. तब्बल ८०,००० चौरस फुटाचा महाकाय मंडप उभारण्यात आला असून त्यातील प्रत्यक्ष दांडिया नृत्य (Dandiya dance) खेळण्यासाठी ५०,००० चौरस फूट क्षेत्रफळ दांडिया प्रेमींना उपलब्ध आहे. बॉलिवूडमधील आघाडीचे कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी साकारलेल्या हिंदू मंदिराच्या भव्य प्रतिकृतीच्या सजावटीने व्यासपीठ व मंडप आणखीनच खुलून दिसणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो रमो नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, या नमो रमो नवरात्री उत्सवाचे मुख्य आकर्षण गुजराती पारंपरिक गरबा व लोकगीते असून आधुनिक साऊंड ट्रॅकवर बसवलेले दांडिया नृत्य राहणार असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी निलेश गढवी, तृप्ती गढवी, नैतिक नागदा, कोशा पंड्या, अंबर देसाई, दिव्या जोशी असे सुपरहिट कलाकार यंदाचे आकर्षण ठरणार आहे. तसेच रोज मराठी हिंदी व गुजराती सिने कलाकारांची उपस्थिती ही नमो रमो नवरात्रीचे मुख्य आकर्षण असते ते या वर्षीही असणार आहे.

महाराष्ट्रात जशी कोजागिरी साजरी केली जाते, त्याच पौर्णिमेला गुजरातमध्ये रमजट असते. रमजट यंदाचे अनोखे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या वर्षी नमो रमो नवरात्री आगळी वेगळी ठरणार आहे. या ठिकाणी पूर्णपणे मोफत प्रवेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here