@maharashtracity

कोर्स प्रवेश घेणारे डॉक्टर गोंधळात

मुंबई: सेट्रल लेबर इन्स्टिट्युटकडून (Central Labour Institute) सुरु करण्यात आलेल्या असोसिएट फेलो इन इंडिस्ट्रीयल हेल्थ (Associate Fellow In Industrial Health – AFIIH) या विषयाच्या कोर्ससाठी राज्यभरातून ८० डॉक्टरांनी प्रवेश घेतला आहे.

हा कोर्स तीन महिने चालणारा असून हा कोर्स कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन (online) – ऑफलाईन (offline) अशा दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने पूर्ण करु शकतो, असे म्हटले आहे.

मात्र सेंट्रल लेबर इन्स्टिट्युट मुख्य संचालकांनी हा कोर्स ऑफलाईनच करावा अशा सुचना दिल्याने इच्छूक डॉक्टर गोंधळात पडले आहेत. सध्याची कोविड महामारीची स्थिती पाहता कोर्स ऑनलाईन घेतल्यास अधिक सयुक्तिक ठरेल या मागणीसाठी मंगळवारी सायन येथील सेट्रल लेबर इन्स्टिट्युटसमोर हे ८० डॉक्टर आंदोलन करणार आहेत.

Also Read: लसीकरणात तरुणाई आघाडीवर

असोसिएट फेलो इन इंडिस्ट्रीयल हेल्थ कोर्ससाठी कोणताही एमबीएमबीएस (MBBS) डॉक्टर प्रवेश घेऊ शकतो. त्यामुळे राज्यातील ८० डॉक्टरांनी तीन महिन्यांच्या इंडिस्ट्रियल पोस्ट कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे.

केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासन यांच्या गाईडलाईन्स नुसार ऑन लाईन तसेच ऑफ लाईन कोर्स देण्यात येणार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. कोरोना महामारी नियमामुळे ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत.

मात्र सेट्रल लेबर इन्स्टिट्युट मुख्य संचालकांनी ऑफलाईन कोर्स होणार असल्याच्या सुचना दिल्या आहेत. हा कोर्स ऑफलाईनच करण्यात येणार असून ऑन लाईन होणार नसल्याचे संचालकांनी सांगितल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये राज्यभरातील डॉक्टर असून यात ६० ते ६५ वर्षाचे डॉक्टर देखील प्रशिक्षण घेणार आहेत. यावर भारतीय जनता पार्टी (BJP) वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नितू पाटील यांनी ही बाब माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ध्यानात आणून दिली आहे.

या कोर्ससाठी राज्यभरातून इच्छूक येणार असून महामारीच्या नियमात ते बसणारे नाही. शिवाय या ठिकाणी हॉस्टेल तसेच उपहारगृहाची सोय नसल्याने ऑफ लाईन कोर्स सयुक्तिक ठरतो असे म्हणणे डॉ. निलेश पाटील यांनी मांडले आहे.

या महामारीत ६० ते ६५ वयोगटातील नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात येत असताना मुंबई सारख्या ठिकाणी दररोज येजा करणे योग्य नसल्याचे हे डॉक्टर सांगत आहेत. ऑफलाईन कोर्स सयुक्तिक असल्याचे सांगण्यासाठी आज मंगळवारी सायन येथील सेट्रल लेबर इन्स्टिट्युटसमोर हे ८० डॉक्टर आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here