@maharashtracity
धुळे: अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या समाज कंटकांविरोधात सोमवारी राजमाता रमाई महिला मंचच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर महामोर्चा (Morcha at SP office) काढला.
राजमाता रमाई महिला मंचच्या नेतृत्वाखाली जेलरोडपासून सोमवारी सकाळी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नगरसेविका वंदना भामरे, महिला बालकल्याण सभापती योगिता बागुल, शोभा चव्हाण, सरोज कदम, मिना बैसाणे, विमल बेडसे, सरला निकम, सुशिला ईशी, बानुबाई शिरसाठ, कल्पना सामुदे, नयना दामोदर, प्रा.प्रेमलता जाधव, अॅड.भाग्यश्री अहिरे, माया पानपाटील, संगिता खैरनार, अॅड.शितल जावरे, वंदना मोहिते, शोभा बैसाणे, पुनम शिरसाठ, पल्लवी मगरे, चंदा साळवे, कोमल वाघ,सिता जाधव, कल्पना लोंढे, अरूणा मोरे, नालंदा निळे, प्रज्ञा नेरकर आदी सर्व पक्षीय महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील मयुर मोरे, बंटी विजय मोरे, कैलास मोरे, मनोज मोरे या चौघांवर विनयभंग (molestation), अवहेलना याबाबतचे वाढीव कलम लावावे. त्यांच्या ऑडिओ क्लिपची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ती ऑडिओ क्लिप इंटेलिजेन्स डिपार्टमेंटकडे सोपविण्यात यावी.
यापुढे कुठलाही जातीचा माणूस कुठल्याही जातीच्या स्त्रीची या प्रकारे अवहेलना करण्याची हिंमत करू नये म्हणून चौघांही आरोपींना पाठीशी न घालता कठोर शिक्षा करावी. तसेच आरोपींना आसरा देणार्या एका पोलिस कर्मचार्याची चौकशी करून त्यालाही आरोपी करून निलंबित करावे. सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकिल अॅड.उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांची नेमणूक करण्यात यावी. हा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालविण्यात यावा, आरोपींची मोबाईल रेकॉडींगची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.