@maharashtracity

धुळे: अवैध सावकारीच्या आरोपाखाली अटकेत असलेले विमा एजंट राजेंद्र बंब यांच्या बँक लॉकरमध्ये दोन कोटी ५४ लाख रुपयांची रोख रक्कम व १९ लाख रुपये किमतीचे सोने आढळले. जळगाव जनता बँकेतील चौकशीत ही माहिती उघड झाली.

धुळे पोलिसांनी केलेल्या गुरुवारच्या कारवाईतही एक कोटी ४२ लाख रुपये व ४६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

पोलिसांनी या कारवाईचा भाग म्हणून आणखी दोन लाॅकरची तपासणी करण्याची तयारी ठेवल्याने आणखी काही रक्कम किंवा ऐवज हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आजच्या कारवाईतील दोन कोटी ५४ लाख ८६ हजार ६०० रुपये आणि १९ लाख ११ हजार रुपये किमतीचे दागिने असा एकुण दोन कोटी ७४ लाख ९९ हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here