@maharashtra.city
धुळे: मुंबई- आग्रा महामार्गवरील मित्रनगर (ता. धुळे) जवळ काल रात्री झालेल्या अपघातात तीन जण ठार तर नऊ जण जखमी झाले. तरडी (ता.पारोळा) येथून पुणे (Pune) येथे लग्नासाठी निघालेल्या क्रूझर वाहनावर अपघातग्रस्त ऍपे रिक्षा धडकली.
भरधाव मालमोटार अँपे रिक्षावर धडकल्यावर अपघातग्रस्त रिक्षा विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूझरवर धडकली. सरलाबाई पंडित सोनवणे (वय २९) व रिक्षा चालक रईस शेख व महेंद्र चुडामन पाटील (वय ५१) सर्व रा. तरडी (ता पारोळा जि. जळगाव) यांचा मृतात समावेश आहे.
पोलिसांच्या मदतीने जखमींना तत्काळ धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
मालेगावकडून मध्यप्रदेशकडे कांदा भरून जाणाऱ्या भरधाव मोटारीने अँपे रिक्षाला धडक दिली. यामुळे नियंत्रण सुटलेली रिक्षा महामार्गावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूझरवर धडकली. या अपघातात ॲपेरिक्षा आणि क्रूजर गाडीचा अक्षरश चक्काचूर झाला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यात आली.
अपघातातील जखमींची नावे अशी- विद्या भूषण कानडे (वय २१),सुरेश नारायण सोनवणे (वय ६०),ताराबाई अशोक वसरे (वय ५०),सुपडू बारकू वसरे (वय ५५),कोयल प्रमोद सोनवणे (वय १२),वसंत पंडित वंजारी (वय ३३),प्रमोद रमेश सोनवणे (वय ४५) सुधीर अभिमान पाटील (वय ५४ ),अरुणाबाई प्रमोद पाटील (वय ४५).