Twitter : @maharashtracity

मुंबई

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ यांच्या वतीने कोकणात गणेश उत्सव काळात आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ धर्मवीर एक्सप्रेस सोडावी, असे निवेदन देण्यात आले होते. त्याचवेळी कोकणातील प्रवाशांचा मागणीचा विचार करुन उद्धव ठाकरे गटाचे खा. राजन विचार यांनी तशा मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले. या निवेदनाला कोकण रेल्वे कॉपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने सकारात्मक उत्तर आल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ प्रवासी संघटनेकडून मागणी करण्यात आली होती. ही मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मांडली. खा. विचारे यांच्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवर कोकणात जाणारे बहुतांश प्रवासी येत असतात. ठाणे, मुंबई उपनगरे तसेच मीरा – भाईंदर, नवी मुंबईसारख्या परिसरातून कोकण प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनात गावी जाण्यासाठी गाडी पकडतात. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे विशेष ट्रेन सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावर कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडकडून कळविण्यात आले आहे की, गणेशोत्सव काळात कोकणवासियांसाठी ठाण्यावरुन विशेष धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करण्यासाठी मध्ये रेल्वेवरुन ०११८५/०११८६ एलटीटी – कुडाळ ही अनारक्षित गणपती विशेष गाडीचा विचार सुरु आहे. या विशेष गाडीचे नाव धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल, असे सांगण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here