जागतिक क्षयरोग दिन विशेष
@maharashtracity
मुंबई: क्षयरोग (TB) आणि कोविड चाचणी (covid test) अहवालनुसार २०२० या कोविडच्या पहिल्या वर्षात २९८ एवढे कोविड पॉझिटिव्ह क्षय रुग्ण होते. हे प्रमाण ०.०६ टक्के एवढे होते. यावर्षी तर २५ मृत्यू झाले होते. तर २०२१ मध्ये २३२ कोविड पॉझिटिव्ह क्षय रुग्ण होते. हे प्रमाण ०.३९ एवढे असून या वर्षी १२ मृत्यू झाले होते. तर २०२२ फेब्रुवारीपर्यंत ३० रुग्ण आढळून आले असून हे प्रमाण ०.२२ टक्के एवढे आहे. म्हणजेच पहिल्या तसेच दुसऱ्या लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कोविड बाधित क्षय रुग्ण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
दरम्यान, कोविड बाधित क्षय रुग्णात एमडीआर क्षय (MDR TB) आढळत असल्याचे प्रमाणदेखील लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. २०१९ या वर्षात ६० हजार ५९७ क्षय रुग्णात ५ हजार ६७३ रुग्ण एमडीआर क्षयाचे होते. तर एक्सडीआर ७९४ रुग्ण होते. यात १ हजार ४७८ जणांचे मृत्यू नोंदविण्यात आले.
तसेच २०२० या वर्षात ४३ हजार ४६४ रुग्णात ४ हजार ३६७ एमडीआर रुग्ण आढळले. तर २०० रुग्ण एक्सडीआर क्षयाचे (XDR TB) होते. तर या वर्षात १ हजार ३५२ रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. तसेच २०२१ या वर्षात ५८ हजार ८४० एकूण क्षय रुग्णात ५ हजार ९०९ एमडीआर रुग्ण आढळले तर एक्सडीआर क्षयाचे १२६ रुग्ण आढळले. तसेच या वर्षात १ हजार ९१७ मृत्यू नोंदविण्यात आले आहे.