By Santosh Masole
@SantoshMasole
धुळे: सततच्या नापीकीसह बँकेतील पीक कर्ज व शेतीसाठी घेण्यात आलेल्या कर्जाच्या विवंचनेतुन ६२ वर्षीय शेतकऱ्याने गुरांच्या गोठ्यातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतकरी विजय डिगंबर निकम यांनी दि १२ जून रोजी रात्रीच्या सुमारास गुरांसाठी असलेल्या गोठ्यात लोखंडी अँगलला दोरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
शेतकरी विजय निकम हे सततच्या नापिकीमुळे चिंतेत होते. त्यात त्यांनी स्टेट बँकेतून व सेंट्रल बँकेतून पिककर्ज व शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्याची देखील परतफेड न झाल्याने चिंतेत असलेले विजय निकम यांनी गळफास लावून जिवनयात्रा संपवली असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.