@maharashtracity

घटत्या रुग्णसंख्येत मृत्यूदराची चिंता

मुंबई: गेल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या सतत खालावताना दिसून येत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांचे (corona patients) होणारे मृत्यू हे जोखमीच्या आजारातील रुग्णांचे असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहेत. (Rise in co-morbid patients in laat two months)

ही बाब चिंताजनक असून ज्या दिवशी राज्यात एकही मृत्यू होणार नाही त्या दिवशी कोरोना नियंत्रणात आला, असे म्हणू शकतो असे तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात एकूण 60,222 नवीन कोविड रूग्ण आढळले. तर एकूण 1149 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे सरासरी मृत्यू दर 1.90% वर नोंद करण्यात आला. तर सप्टेंबरमध्ये मृत्यू दर 2.04% वर होता. या महिन्यात 1754 मृत्यू तर 85,980 नवीन रूग्ण नोंदवले होते.

Also Read: दिवाळीच्या ५ दिवसांत फटाक्यांमुळे ५८ ठिकाणी आगीच्या घटना

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असली तरी, प्रकरणातील मृत्यू दर अजूनही अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या चार दिवसांत 4,221 नवीन रुग्णांमधील 129 रुग्णांचे मृत्यू झाले.

1.5% पेक्षा कमी मृत्यू दर असल्यास महामारी नियंत्रणात असल्याचा अंदाज करू शकतो. मात्र, मृत्यूदर विशिष्ट वेळी नोंदवलेला असल्यास त्याचा विचार करावा लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्येष्ठ नागरिक (senior citizen) किंवा कॉमोरबिडीटी (comorbidity) असलेल्या रुग्णांचा मृत्यू हे सध्या मृत्यू दर वाढविण्यास कारणीभूत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात दररोज 30-40 मृत्यूची नोंद झाली आहे.

सध्या मृत्यू दरात घट होत असली तरी 1.5% पेक्षा कमी मृत्यू दर असणे आवश्यक असल्याचे डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले. तर राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr Pradeep Awate) यांच्या मते राज्यातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणायचे आहे. मात्र सध्या दिसणारे मृत्यू मुख्यतः ज्येष्ठ नागरिक किंवा कोविड (covid) विषाणूची लागण झाल्यानंतर कॉमोरबिडीटी असलेल्या रुग्णांचे असल्याचे डॉ. आवटे म्हणाले.

दरम्यान, सध्या सुरु असलेले सण उत्सवांचे दिवस आगामी काळात महत्वाचे ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here