@maharashtracity

मुंबई: सध्या लसीकरण कमी होत असल्याने दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी कोरोना प्रसाराचे कारण ठरु शकते. त्यामुळे संसर्गातील चढ उतार लक्षात घेऊन लसीकरण पूर्ण करण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा, असे आवाहन राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी केले आहे.

दरम्यान, काही आरोग्य तज्ज्ञांनी दिवाळी सुटीत (Diwali festive season) लसीकरण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांत राज्यात सुमारे ६५ लाख तर मुंबईत जवळपास ४ लाख लाभार्थ्यांनी मोफत बूस्टर डोस (Booster dose) घेतला. मात्र, या मोहिमेनंतर राज्यासह मुंबईतील बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. नुकतेच कोविशिल्डचे लाखो डोस वाया गेले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गापासून खबरदारी म्हणून लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.

सामान्यांनी लसीकरणाविषयी उदासीनता न दाखविता बूस्टर डोसला प्राधान्य द्यावे असे मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. तसेच गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या (corona patients) वाढली असून कोरोनाच्या नव्या एक्सबीबी ओमायक्रॉन बीक्यू १ या सब व्हेरियंटची यात भर पडली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोविड रुग्णांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सणांमध्ये कोविड नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने (covid task force) वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here