@maharashtracity

मुंबई: मुंबईत रुग्ण संख्या स्थिरावली असल्याच्या आकडेवारी वर जाऊ नका. संसर्ग प्रसार रोखण्यासाठी लसीकरण आणि मास्क वापरावाच लागेल. त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती बिघडू शकेल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी बुधवारी दिला.

टोपे पुढे म्हणाले कि, आज बुधवारी राज्यात ४६ हजार कोरोना रुग्ण (corona patients) नोंद होण्याची शक्यता असून पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) २१.०४ टक्क्यांवर जाणार आहे. सध्या दाखल १४ टक्के रुग्णांमधील २.८ टक्के जण आयसीयू (ICU) आणि वेंटीलेटरवर (ventilator) आहेत. त्यामुळे गंभीर होऊन लसीकरणावर भर द्यावा, असे टोपे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

लसीकरणासारख्या (vaccination) राष्ट्रीय उपकमाला अडथळा करू नये, असेही टोपे यांनी असा इशारा दिला आहे. दरम्यांन, पहिला डोस ९० टक्के तर दुसरा डोस ६२ टक्के झाला असून सध्या ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन (oxygen) लागत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

नाॅन कोविड (nnon-covidpatients) अडीचशे तर कोविड रुग्णांसाठी दिडशे असे मिळून चारशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. दुसऱ्या लाटेत जास्त मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याने नाॅन कोविड शस्त्रक्रिया थांबवल्या होत्या, असेही टोपे म्हणाले. सध्या तशी स्थिती नसली तरी ती वेळ येऊ द्यायची नाही, असे ते म्हणाले.

तुर्तास शाळा बंदच:

शाळा बंद करण्याचा निर्णय योग्य असून सध्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तुर्तास शाळा बंदचा (school closed) निर्णय योग्य आहे. आगामी १५ दिवसांच्या रुग्ण संख्या निरीक्षणावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. पर्यटन (tourism) खुले करण्याची बाब तेवढी महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मास्क लावू नये सांगणाऱ्यावर कायदेशीर कारवाई

सध्या सोशल मीडियावर मास्क लावू नका असे सांगण्यात येत आहे. तशा संदेशांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले असता टोपे यांनी मास्कचे महत्व स्पष्ट केले. मास्क वापरु नका असे सांगण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई (legal action) करण्यात येईल असे स्पष्ट सांगितले.

Also Read: आता सर्वच दुकानांना मराठी पाटी बंधनकारक

सेल्फ टेस्ट करणाऱ्यांची नोंदणी व्हावी

सध्या सेल्फ टेस्ट किटची (sself-testkit of cthe orona) विक्री वाढत असून घरीच टेस्ट करुन घेण्याचे प्रकार वाढील लागले आहेत. अशा सेल्फ टेस्टमुळे रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा टेस्टची नोंदणी देखील आरोग्य विभागाच्या वेबवर कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच त्यांना गृहविलगीकरणात (home quarantine) ठेवण्यात येणार असून कोविड प्रोटोकाॅल प्रमाणेच निरीक्षण नोंदविण्यात येईल असे ते म्हणाले. सध्या कोवॅक्सिन लसीची (covaxin vaccine) मागणी करण्यात येत असल्याचे टोपे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here