@maharashtracity
राज्यात २६,५३८ नवीन रुग्ण
मुंबईत १५०१४ रूग्ण
राज्यात १४४ ओमीक्रॉन रूग्ण
मुंबई: राज्यासह मुंबईत बुधवारी राज्यात कोरोना (rise in corona patients) उच्चांकीची सुरुवात झाली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. राज्यात २६,५३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत १५०१४ रूग्ण आढळले. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,५७,०३२ झाली आहे.
मंगळवारी ५,३३१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,२४,२४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ८७,५०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात बुधवारी ८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९७,७७,००७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,५७,०३२ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,१३,७५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत (Home Quarantine) तर १३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional quarantine) आहेत.
मुंबईत १५०१४ रूग्ण
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात दिवसभरात १५०१४ कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईतील (Mumbai) एकूण रूग्ण संख्या ८३१९७९ एवढी झाली आहे. दरम्यान, बुधवारी ३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १६३८४ एवढे मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात १४४ ओमीक्रॉन रूग्ण
राज्यात बुधवारी १४४ ओमीक्रॉन संसर्ग (omicron) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) रिपोर्ट केले आहेत. या १४४ रुग्णांमध्ये मुंबई १००, नागपूर -११, ठाणे मनपा आणि पुणे मनपा ७, पिंपरी चिंचवड ६, कोल्हापूर- ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी २, पनवेल आणि उस्मानाबाद प्रत्येकी १ असे सांगण्यात आले. आजपर्यंत राज्यात एकूण ७९७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले.