@maharashtracity
२४ तासात ३ हजाराने रूग्ण घटले
राज्यात ६,०१७ नवीन रुग्ण
मुंबई: राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी राज्यात तब्बल ३ हजाराने रूग्ण घटले. रविवारी राज्यात ९ हजार रूग्ण नोंद झाली होती. तर सोमवारी राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,२०,२०७ झाली आहे. काल राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद झाली.
आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,२०,२०७ झाली आहे. आज १३,०५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ५९,९३,४०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात सोमवारी ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५६,४८,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात ४०३
मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३१५६१ एवढी झाली आहे. तर १४ कोरोना बाधित रुग्णांचा (corona patient) मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५७१६ मृत्यूची नोंद करण्यात आली.