@maharashtracity
मुंबई: राज्यात रविवारी ४,७८० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३१,९९९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ % एवढे झाले असल्याचे दिलासादायी वृत्त आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी ४,१४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२४,६५१ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ५३,१८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात काल १४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ (१२.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात २९४
मुंबईत (Mumbai) दिवसभरात २९४ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४११६४ एवढी झाली आहे. तर १ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९४७ मृत्यूची नोंद करण्यात आली.