By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: प्रकिया केल्याविना नाल्याचे पाणी नद्यांमध्ये सोडता येणार नाही. प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम तसेच अन्य उद्योगांसाठी वापरावे अशा सुचना औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. राज्यातील नद्या प्रदूषित होऊ याविषयी दक्षता घेण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तर तासात विधानसभेत दिले.

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथील कामवरी नदीमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले असल्याविषयी रईस शेख यांनी प्रश्न विचारला होता. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नद्यांमध्ये नाल्यांचे पाणी सोडल्यामुळे राज्यातील नद्या प्रदूषित होत आहेत याकडे लक्ष वेधले.

उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कामवरी नदीतील जलपर्णी जेसीबी आणि पोकलेन यांच्या साहाय्याने काढण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. हर्बलची फवारणी केल्यानंतर काही ठिकाणी जलपर्णी नष्ट झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे नगरविकास विभागाकडून जलपर्णी नष्ट करण्यासाठी काम करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी वापरावे, अशा सूचना औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. पाण्याचा पूनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here