@maharashtracity

इस्लामपूर (सांगली): “प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य” या संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी चंद्रशेखर क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्र राज्याध्यक्ष संतोष राजगुरु यांनी जारी केले.

या पत्रात असे म्हटले आहे की क्षीरसागर यांची नियुक्ती संघटनेच्या ध्येय धोरणास कटीबध्द असून त्यांनी प्रामाणिक वाटचाल करुन संघटनेचे व आमदार बच्चु कडू (MLA Bachchu Kadu) यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे. “आपल्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. संघटनेच्या ध्येय धोरणांना कटीबध्द राहून संघटनेची कीर्ती वाढवावी असे काम करावे,” असेही पत्रात नमूद केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की, सांगली (Sangli) जिल्ह्यात शिक्षक भारती उभी करताना रक्ताचे पाणी करून काम केले. त्याच ताकतीने व नव्या जोमाने आमदार बच्चू कडू यांच्या विचाराने व राज्याध्यक्ष संतोष राजगुरु यांच्या मार्गदर्शनात सांगली जिल्ह्यात प्रहार संघटना (Prahar Sanghatana) उभी करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here