@maharashtracity
धुळे: धुळे ल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलन करूनही मागण्या मंजूर केल्या जात नाही. शिक्षक भरती तत्काळ सुरू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना त्रिस्तरीय आश्वासित प्रगती योजना लागू करावी, या मागणीकरीता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) शिक्षक आघाडीने शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने (protest) केलीत.
या आंदोलनात भाजप शिक्षक आघाडीचे नाशिक विभागीय संयोजक महेश मुळे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्र.ह. दलाल आदी सहभागी झाले होते. याबाबत शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यात यावी, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित करण्यात याव्या, 1 नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे बंद केलेले भविष्यनिर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करावे, दरमहा एक तारखेला वेतन द्यावे.
वेतनास विलंब करणार्या संबंधित अधिकार्यांना तत्काळ निलंबित करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भविष्यनिर्वाह निधीसह वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात यावी, पायाभूत पदे मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.