भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

@maharashtracity

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून धनगर समाजातील (Dhangar community) मुलीचे अपहरण करण्यात आले. याबाबत पोलिसात तक्रार करण्यास गेलेल्या मुलीच्या आई वडिलांना पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केली, धमकी दिली आणि खंडणी (extortion) वसूल केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP leader Gopichand Padalkar) यांनी केली आहे. या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पडळकर यांनी केली आहे.

पडळकर म्हणाले, आमच्या धनगर समाजातील मुलीचे नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून अपहरण (kidnap) करण्यात आले. “तिच्या आई वडीलांनी ६ मे २०२२ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी आई वडीलांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी केली आणि १ लाख पंचवीस हजार रूपये वसूल केले,” असा आरोप पडळकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ही बाब मी जिल्हा पोलिस अधीक्षक (SP) यांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्यांचा जवाब नोंदविला. गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse – Patil) यांनी त्वरित मुलीला सुखरूप आई – वडिलांकडे सुपूर्द करण्याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत आणि तात्काळ संबंधित पीआयला निलंबित करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मला आंदोलन करण्यास भाग पाडू नका, सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुढे कायदा व सुव्यवस्थेची (Law & Order) परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार आपणच राहाल, असा इशारा पडळकर यांनी गृहमंत्री यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here