सभापती नवलेेंचे शिवसेनेला आव्हान

@maharashtracity

धुळे: धुळे मनपाच्या पाणी पुरवठा योजनेत वॉटर ऑडीटच्या (water audit) नावाने पाच कोटींचा भ्रष्टाचार (corruption) झाल्याची तक्रार शिवसेनेने (Shiv Sena) केली असताना, भाजपला (BJP) बदनाम करणे थांबवा, तुम्ही भ्रष्टाचार सिध्द करा नाहीतर राजकीय सन्यास घ्या, असे आव्हान स्थायी समितीचे सभापती शीतलकुमार नवलेंनी शिवसेनेला दिले आहे.

स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले (Sheetalkumar Navale) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मनपात सभा झाली. त्यावेळी ते बोलत हेाते. स्थायी समितीच्या सभेत वॉटर ऑडीट, एलबीटी (LBT) वसुलीसह विविध मुद्यांवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच आक्रमक होत प्रश्‍न उपस्थित केले. शहराच्या अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यातही मनपाच्या पाणी पुरवठा योजनेत (Water Supply Scheme) वॉटर ऑडीट करण्याचा घाट घातला जात असून यात मोठा भ्रष्टाचार करण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी केला.

वॉटर ऑडीट हे शहरातील पाणीपुरवठा अधिक चांगला करण्यासाठी आवश्यक आहे. यात पाच कोटीचा भ्रष्टाचार होत असेल तर मी राजकीय संन्यास घेईल. मात्र, विरोधकांनी केवळ आरोप करुन भाजपला बदनाम करु नये. कसा कुठे भ्रष्टाचार होत आहे ते सिध्द करुन दाखवावे. आपण समोरा-समोर चर्चेला तयार आहोत. जर तुम्ही भ्रष्टाचार सिध्द करु शकत नसाल तर राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हान सभापती नवलेंनी शिवसेनेला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here