@maharashtracity

धुळे: शहरात वेगवेगळ्या रहिवासी भागात विविध आस्थापना, बँकांसमोर वाहतूकीस अडथळा ठरणार्‍या वाहनांविरुध्द शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहिम उघडली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी विविध बँकांसमोरील शेकडो वाहनधारकांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले. या करवाईमुळे बेशिस्त वाहन पार्कींग करणार्‍या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. (action against illegal parked vehicles)

पोलिस पथकाने गुरुवारी सकाळी शहरातील ग.नं.3 व 4 मधील विविध राष्ट्रीय बँकांच्यासमोर वाहतूकीस अडथळा ठरतील अशी वाहने लावली होती. यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सेस बँक, बांबु गल्ली, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, गरुड संकुल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा वाहनधारकांवर कारवाई केली. तसेच वाहतूक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here