@maharashtracity

धुळे: तामिळनाडूतील (Tamil Nadu) तंजावर येथे ख्रिश्‍चन मिशनरी (Christian Missionary) संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला सततच्या धर्मांतर करण्यास लावण्याच्या दबावामुळे आत्महत्या (Suicide) करावी लागली.

ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केलीत.

या संदर्भात अभाविपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लावण्या नावाची विद्यार्थीनी तंजावर येथील ख्रिश्‍चन मिशनरींच्या संस्थेत शिक्षण घेत होती. तिने ख्रिश्‍चन धर्म स्विकारावा, यासाठी तिच्यावर संस्थेतील लोकांनी दबाव टाकला. या दबावातून लावण्याने आत्महत्या केली.

ही संस्थात्मक हत्या भारतीय संविधान (Indian Constitution) आणि लोकशाहीला (Democracy) काळीमा फासणारी असून शा धार्मिक उन्मादामुळे असंख्य निष्पापांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. परंतु अद्यापही तेथील सरकारने अपराध्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

लावण्याला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय महामंत्री निधि त्रिपाठी चेन्नई येथे शांततापूर्वक आंदोलन करीत होत्या. परंतु तेथील सरकारने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कृत्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.

तसेच लावण्या आत्महल्या प्रकरणातील अपराध्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे (Dhule) शाखेच्यावतीने देवगिरी प्रांताचे सहमंत्री भावेश भदाणे, वैभवी दिवरे, राजेंद्र पाटील, वैष्णवी मराठे, निखिल तायडे, उदय महाजन, मोहित मराठे, भावेश जाधव, योगेश कोलवळे, हेमराज गद्रे, मोहित मराठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here