@maharashtracity

औरंगाबाद येथील प्रकल्पाची धुळ्यातील शिष्टमंडळाकडून पाहणी

धुळे: औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीतील (Shendra MIDC) दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (DMIC) कामाची पाहणी करून प्रभावित झालेल्या धुळ्यातील उद्योजकांनी धुळ्यातील डीएमआयसीच्या कामाला गती मिळावी, यासाठी दबावगट (pressure group) तयार करण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (Delhi – Mumbai Industrial Corridor) औरंगाबाद येथील कामांची पाहणी करण्यासाठी धुळे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे (NCP) रणजीत भोसले यांच्या नेतृत्वात धुळे (Dhule) शहरातील व्यापारी (traders), उद्योजक (industrialist), सामाजिक, राजकीय पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. जिल्हा कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीने या दौर्‍याचे आयोजन केले होते.

दिल्ली-मुंबई इंडिस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचे औरंगाबाद (Aurangabad) येथे काम कसे सुरू आहे, त्यामुळे जिल्हा विकासाला (Development) कशी चालना मिळाली व किती बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त (employment generation) झाल्यात, याचा अभ्यास व पाहणी करण्यात आली.

आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट कार्यालयाचा पुरस्कार प्राप्त शेंद्रा एमआयडीसी कार्यालयाला प्रथम भेट दिली. या प्रसंगी ऑरिक शेंद्रा प्रकल्पाचे दीपक मुलीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रसंगी प्रकल्पाची माहिती देत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संपूर्ण बावीसशेे एकर क्षेत्रातील कामाची दिवसभर पाहणी केली.

शहराच्या ठिकाणी उभारलेले किओस सुविधा (Kiosk centre) म्हणजे मदत केंद्र एक अद्भुत कल्पना त्या ठिकाणी दिसून आली. धुळ्यातील कॉरिडॉरचे काम जवळपास पंधरा हजार एकरावर प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लाख लोकांना नवीन नोकऱ्या व रोजगाराच्या संधी मिळणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करून जिल्ह्यातील प्रकल्पाला चालना द्यावी.

धुळ्यातील प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी दबाव गट तयार करून कसे काम करता येईल याबाबतही सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली.

या अभ्यास व पाहणी दौऱ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून नितीन बंग, रणजित राजे भोसले, वर्धमान संघवी, कमर शेख, नरेंद्र अहिरे, अब्दुल आहद, जुबेर शेख, प्रसाद देशमुख, हर्षल परदेशी, संतोष ताडे, नीलेश भंडारी, पी.सी.पाटील, राशिद अन्सारी, आताऊ रहमान, राजेंद्र खैरनार, महेंद्र शिरसाठ, श्याम भामरे, हरिष शेलार, विजय पाटील, दत्तू पाटील, राजू रुस्तम, आलमगीर टेलर, नरेंद्र अहिरे, रईंस काझी, चिंतन ठाकूर, नरेंद्र हिरे, विजय पाटील, कृष्णा गवळी, दीपक देसले, अजय पाटील आदींचा समावेश यामध्ये होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here