@maharashtracity

मुंबई: मुंबईत गेल्या २ वर्षात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यास व कोविडच्या तीन लाटा निर्माण होण्यास कारणीभूत ‘विना मास्क’ (no mask) आढळून आलेल्या ४६ लाख व्यक्तींवर पालिकेच्या ‘क्लिनअप मार्शल’ ने (clean up martial) कारवाई करून त्यांच्याकडून ९२ कोटींची दंड वसुली केली आहे.

त्यामुळे आता ‘विना मास्क’ फिरणाऱ्या व्यक्तींना व त्याच्या सोबतच्या व्यक्तींना, नातेवाईकांनाही चांगलाच धडा मिळाला आहे. सुदैवाने पालिका आरोग्य यंत्रणेकडून कोविड रुग्णांवर (covid patients) करण्यात आलेल्या विविध उपाययोजना व कोविड नियम, कडक निर्बंध आदी कारणामुळे कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवरही (second wave of the corona) नियंत्रण आले आहे. अन्यथा कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असती व त्यावर नियंत्रण मिळविण्यात आणखीन दुप्पट कालावधी लागला असता.

मुंबईत शहर व उपनगर असे विभाग आहेत.
उपनगर परिसरात जास्त तर शहर परिसरात झोपडपट्टीचे प्रमाण कमी आहे. मात्र, मार्च २०२० पासून मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्यावेळी कोविडला रोखण्यासाठी पालिकेकडे (BMC) जालीम औषधे व लसही उपलब्ध नव्हती. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोविड रुग्णांवर उपचार केले. मात्र, एकीकडे कोविडला रोखण्यासाठी रुग्णांवर उपचार सुरू असताना दुसरीकडे मुंबईत विना मास्क फिरणाऱ्या, कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तिंमुळे कोविडचा प्रादुर्भावही वाढत होता.

त्यामुळे पालिकेने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर एप्रिल २०२० पासून ते आजपर्यंत दोन वर्षांच्या कालावधीत प्रति व्यक्ती २०० रुपये प्रमाणे ४६ लाख १९ हजार ७५० व्यक्तींकडून तब्बल ९१ कोटी ८७ लाख ८४ हजार ७५ रुपये वसुली केली आहे.

सध्या मुंबईत कोविडची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोविड हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना कोविड नियमांचे पालन करावेच लागणार आहे. विना मास्क फिरल्यास संबंधित व्यक्तींवर पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here