मुंबईत दिवसभरात ५९६ बाधित
@maharashtracity
मुंबई: राज्यात शुक्रवारी ८,९९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,४०,९६८ झाली आहे. काल १०,४५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,००,४४० कोरोनाबाधित रुग्ण बरे (corona update) होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१२,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात शुक्रवारी २०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. काल नोंद झालेल्या एकूण २०० मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५३८ ने वाढली आहे.
हे ५३८ मृत्यू, पुणे-८९, पालघर-८३, रायगड-६८, कोल्हापूर-६०, ठाणे-५७, अमरावती-५६, सांगली-५४, रत्नागिरी-१९, नाशिक-७, औरंगाबाद-६, सातारा-६, अकोला-५, चंद्रपूर-५, जालना-५, सोलापूर-५, बुलढाणा-४, नागपूर-३, सिंधुदूर्ग-२, वर्धा-२, उस्मानाबाद-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
सध्या राज्यातील (Maharashtra) मृत्यूदर २.०३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३५,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,४०,९६८ (१४.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ६,२७,२४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात ५९६
मुंबईत दिवसभरात ५९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२६६३३ एवढी झाली आहे. तर १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५५९९ मृत्यूची नोंद करण्यात आली.