@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८०,७४,३६५ झाली आहे. काल १२२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,१४,४३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ११,७५८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी २ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३६,७८,६०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,७४,३६५ (०९.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ३३२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ३३२ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,३२,५८२ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,६६६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here