@maharashtracity
मुंबई: १८ ते ४४ या वयोगटात गेल्या सात दिवसात ८० हजार कोरोना संसर्ग (corona infection) झाल्याने या वयोगटात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र हा वयोगट पार्टी ऍनिमल असल्याचे सांगत दोन डोस घेतल्यावरही मास्क (mask) तसेच सोशल डिस्टंसिंगचे (social distancing) पालन या वयोगटाकडून होत नसल्याचे सांगण्यात आले.
याच वयोगटात हेल्थ केअर वर्कर (healthcare workers) तसेच डॉक्टर येत असून यांना कोविड वर्तणुकीचे पालन करण्याचे सुचविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटात गेल्या सात दिवसात ८० हजार संसर्ग झाल्याचे कारण तज्ज्ञांकडून शोधण्यात आले. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी, जे सहव्याधी रुग्ण तसेच मधुमेह (diabetes) आणि उच्च रक्तदाबाचे (high blood pressure) रुग्ण आहेत. शिवाय ज्यांनी कोविड वर्तणूक पाळली नाही अशांना लस घेऊनही कोरोना झाला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
शिवाय या वयोगटात बहुतांश डॉक्टर तसेच हेल्थ केअर वर्कर येत असून हे रुग्णालयात मास्क लावत. मात्र घरी किंवा रुमवर गेल्यावर मास्क न लावता वावर करत असत. गाठीभेटीतून त्यांना बाधा झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा डॉक्टरांना देखील सामाजिक दुरीकरण पाळण्यासंबंधीत सुचना पालिकेककडून करण्यात आल्या असल्याचे पालिकेचे कार्यकारी आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.
कार्यक्रमातून गेल्यास मास्क लावण्याची सूचना देखील देण्यात आली होती. संपर्कात येणारा व्यक्ती संक्रमित असल्यास तसेच मास्क न लावल्यास बाधित होण्याची शक्यता काकाणी यांनी वर्तविली. मुंबईत शारीरिक अंतर राखणे कठीण असले तरी मास्क आणि हाथ धुणे हे नियम पाळले तरी पुरेसे असल्याचे काकाणी म्हणाले.