@maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी ६७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या ८१,३४,५०७ झाली आहे. काल ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,१४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१६ टक्के एवढे झाले आहे. 

राज्यात आज रोजी एकूण ९६२ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात सोमवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५४,४७,९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३४,५०७ (०९.५२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १५ बाधित 

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १५ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,७५३ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here