@maharashtracity
मुंबई: राज्यात कोरोना संसर्गित डॉक्टरांची (corona affected doctors) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारपर्यंत ५९८ निवासी डॉक्टर (Resident Doctors) बाधित झाले असल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे (Dr Avinash Dahiphale) यांनी सांगितले.
मुंबई (Mumbai) परिसरातील सरकारी रुग्णालयातील एकूण ४८८ डॉक्टर बाधित झाले असल्याचे सांगण्यात आले. यात जेजे १३४, कुपर ७, केईएम ११५, सायन १२२ तर नायर ११० असे प्रमुख रुग्णालयातील डॉक्टर बाधित झाले असल्याचे सांगण्यात आले.
अशा प्रकारे एकूण ४८८ डॉक्टर्स कोरोना बाधित झाले असून मुंबई परिसरातून सर्वाधिक बाधित झाले आहेत. दरम्यान, राज्यातील इतर जिल्हा रुग्णालयातील बाधित डॉक्टरांमध्ये लातूर ५, धुळे ८, मिरज २, नागपूर ६, औरंगाबाद ४, ठाणे १६, सोलापूर २५, कोल्हापूर २, पुणे १८, नांदेड ७, पिंपरी १०, अकोला १, अंबेजोगाई २ असे असल्याचे सांगण्यात आले.