@maharashtracity

महाड: महाड शहरानजीक गांधार पाले गाव हद्दीत सोमवारी दोन टेम्पोच्या अपघातात टेम्पो मधील दोन प्रवासी आणि तीन महिला पादचारी असे ५ जण गंभीर जखमी झाले.

गोवा ते मुंबई जाणारा आयशर टेम्पो क्रमांक जीए ०३/ एएच – २००३ हा मुंबई ते सिंधुदुर्ग जाणारा टेम्पो क्रमांक एमएच ०७ / एजे -३४६८ याला घासत त्याच गावातील शेतीच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन महिला सुमन वसंत जाधव, आशा अशोक शिगवण, वनिता सदानंद गायकवाड सर्व राहणार गांधार पाले यांना उडवत गेला.

या अपघातात या तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्याचबरोबर टेम्पो चालक अंकुश सरोज आणि एक ९ वर्षाचा मुलगा अभिमन्यू सरोज राहणार उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे देखील जखमी झाले. या अपघातात एकूण ५ जण जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंभीर जखमी दोन महिलांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here