@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ४,८३१ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,५२,२७३ झाली आहे. काल ४,४५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५९,९०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२% एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ५१,८२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात काल १२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३४,५६,४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,५२,२७३ (१२.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,९२,५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३९१

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३९१ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४३१५४ एवढी झाली आहे. तर ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९७२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here