@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ३६२ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६८,८१३ झाली आहे. आज ६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७.१७,३६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ % एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ३,७०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात रविवारी ३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८२,८१,२५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६८,८१३ (१०.०५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,२९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ४३ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४३ एवढे रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत एकूण १०,५५,९९७ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९२ एवढी झाली आहे.

ऑमीक्राेनचे ६१ रुग्ण

रविवारी राज्यात ६१ ऑमीक्राेन संसर्ग रुग्ण (omicron patients) आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. यात पुणे मनपा- ४४, पिंपरी चिंचवड मनपा-८ व पुणे ग्रामीण ९ असे आहेत. आजपर्यंत राज्यात ५७२६ ओमीक्राेनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४७३३ रुग्णांना आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी साेडण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here