@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी २,४०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६४,९१५ झाली आहे.
आज २,८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८८,८९९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३३,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
तसेच राज्यात मंगळवारी ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९४,६९,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६४,९१५ (११.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,४०,०५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात ४२७
मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४२७ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. ही दैनंदिन नोंद सोमवारच्या तुलनेत ८८ रुग्णांनी चढ होती. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४६०७९ एवढी झाली आहे. तर २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६१२९ मृत्यूची नोंद करण्यात आली.