@maharashtracity

राज्यात एकूण १६,९०५ तर मुंबईत दिवसभरात ३०७ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई: राज्यात शनिवारी ११३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित (corona positive) रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,९०६ झाली आहे. आज २,१४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४९,१८६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५७% एवढे झाले आहे. 1130 new corona positive patients in the state

राज्यात आज रोजी एकूण १६,९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

दरम्यान राज्यात शनिवारी २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर (death rate)२.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२५,५९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,९०६(१०.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६७,०६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये ( home quarantine) आहेत तर ८९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ( quarantine centres) आहेत.

Also Read: दुसऱ्या डोसची होतेय टाळाटाळ

मुंबईत दिवसभरात ३०७

मुंबईत ( mumbai) दिवसभरात ३०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५६४४१ एवढी झाली आहे. तर ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२४४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here