Twitter : @maharashtracity
मुंबई
प्रख्यात मालिका आणि चित्रपट लेखक नंदू परदेशी लिखित आणि अग्रगण्य संस्था ‘भरारी प्रकाशन’ प्रकाशित ‘विलक्षण चित्रे, निरिक्षण चित्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे सुप्रसिद्ध कवी-लेखक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी अभिनेते विजय गोखले, शैलेश दातार, व्हायोलिन वादक महेश खानोलकर, ज्येष्ठ सतार वादक पं. शंकर अभ्यंकर, मनिषा कोरडे, शिबानी जोशी आणि प्रकाशिका लता गुठे अशा नामवंत मंडळींसह नंदू परदेशी यांचा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. हा कार्यक्रम नॅशनल लायब्ररी आणि चिन्मय प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अनिल हर्डिकर यांनी केले.