@maharashtracity

By संदीप वर्टी

मुंबईच्या कोरोनावर मात करणा-या पॅटर्नचे जगभर कौतुक, अनेक राज्यांकडून त्याचे अनुकरण अशा बातम्यांनी काही दिवसांपूर्वी सगळी प्रसारमाध्यमे भरली होती. महापौरांनीही आपली पाठ चांगलीच थोपटून घेतली.

पण खरे वास्तव भयंकर आहे. कारण ज्यावेळी अनलॉकची घोषणा झाली तर मुंबई पहिल्या किंवा दुस-या पातळीवर नव्हे तर चक्क तिस-या पातळीवर आहे. जे कौतुक गोंदिया आणि नंदुरबार या जिल्ह्यांचे व्हायला हवे ते मुंबईच्या बाबतीत चुकीचे झाले. वास्तविक कदाचित टायपिंग मिस्टेक बन असू शकेल, त्या जिल्ह्यांच्या जागी मुंबईचे नाव चुकून घेतले असेल.

वास्तविक उठसूठ लॉकडाऊन करण्याचीच कर्तबगारी मुबंई प्रशासनाने अवलंबिली आहे. जर मर्दुमकी असेल तर मुंबईत येणा-यांवर चाचण्यांचा प्रतिबंध असायला हवा तसेच वस्त्यावस्त्यामंध्ये पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी फिरून कोरोना दूर करायला हवा.

आपल्या वातानुकूलित कॅबिनमधून ज्यावेळी पालिकेचे मोठ्या संख्येने असलेले अनेक आयुक्त सामान्य वस्त्यांमध्ये फिरतील तेव्हा कोरोनाची पळता भुई थोडी होईल. पण मुंबईचे तितके नशीब कुठे ? त्यातच भर म्हणजे अनेक आयुक्त हे मूळ मुंबईचे स्थायिक नाहीत. ते मुंबईबाहेरील भागातून असतात. त्यामुळे त्यांच्याकडे मनापासून जी कळवळ असायला हवी ती मुंबईच्या बाबतीत अभावानेच असते. त्याचा फटका मूळ मुंबईकरांना बसतो.

  • संदीप वर्टी, कुलाबा, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here