@maharashtracity
@anju_nimsarkar
अनिष्ट चालीरीती या समाजातील काही प्रभावशाली लोकांमुळे जशा निर्माण होतात, तशाच त्या समाजातील जागरूक लोकांमुळे अनिष्ठ चालीरींतीवर पायबंदही बसतो.
महाराष्ट्रासह भारतात पतीच्या निधनाच्यावेळी प्रेताजवळच पत्नीचे कुंकू पुसणे, गळयातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे या सारख्या प्रथांचे पालन केले जाते. या अशा जुन्या रूढी परपरांमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून समाजात अवहेलना सहन करावी लागते.
अशा या कुप्रथांना संपविण्याचा निर्णय नुकताच कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड या ग्रामपंचायतीने सर्वांनुमते मंजूर केलेला आहे. याचेच पूढचे पाऊल महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यस्तरावर शासन परिपत्रकांच्या माध्यमातून अशा अनुचित प्रथेबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी, असे परिपत्रात निर्देशित करण्यात आलेले आहे.
माहिती आणि जनसंपर्क खात्यात असल्यामुळे कामाच्या अनुषंगाने अथवा रोजच्या वर्तमान पत्रातील ताज्या घडामोडी वाचनामुळे/ समाजमाध्यमांमुळे बातम्यांची माहिती होत असते.
कामाचा भागही सोडला तरी अशा चांगल्या बांबीचा अभ्यास, वाचनाची आवड असल्यामुळे अशा सकारात्मक घडामोंडीचा मला वेध असतो. सोबतच आंबेडकरी विचारांची साथ असल्याने कुठल्याही प्रथा पंरपरा पाळतांना तार्किक विचार करूनच करण्याची सवयही झाली आहे.
माझे काका आजारी होते आणि त्यांचे निधन 27 जून रोजी रात्री 9 वाजता झाले. मी पहाटे विमानाने दिल्लीहून नागपूरात आली. काका गेल्याची बातमी व्हॉट्स अपच्या माध्यामातून, फोनहून, ज्यांचे फोन नंबर नव्हते त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन दिली.
बाकी भाऊ, इतर नातेवाईकांनी सामान आणा, पाणी गरम कर, आंघोळ कर, प्रेताला नवीन कपडे घालून दे असे प्रथे प्रमाणे केले. पंचशील झाले. सर्वांनी हार-फुले प्रेतावर टाकली.
त्यानंतर सोन्याचा मणी प्रेताच्या तोंडात ठेवण्याची प्रथा आमच्याकडे आहे. ते ही त्यांच्या पत्नीच्या गळयातील मंगळसूत्रातील मणी ठेवला जातो. हे मंगळसूत्र तोडण्याचे काम वहिणी आणि जवळचे नातेवाईक करीत असतात.
असे होण्यापूर्वी मी ठामपणे मामींना आणि जवळच्या नाते वाईकांना सांगितले, असे काहीही करायाचे नाही. जर काही दयायचे असेल तर त्यांच्या नावाने आपण वेगळे दान करूया. माझ्या सांगण्याने त्यांनीही दुजोरा दिला आणि तस काहीच केल नाही. त्या क्षणाला असे वाटले त्या बाईला (काकू) ला एवढे दु:ख झालेले आहे काकांच्या जाण्याने आणि अशा दु:खद समयी असे सर्व अनष्टि चालीरीतींचे पालन कित्येक दशके आपण करीत आलेलो आहोत.
त्या स्त्रीची सामाजिकरीत्या किती कुंचबना केली जाते. तीला किती एकट/एकाकी केल जात. खरच हे सर्व अनुभवाने त्या बाईसाठी जीव नसन्यापेक्षा अधिक बोचणारे आहे.
घरात बहिण म्हणून मी मोठी असल्यामुळे अशी अनिष्ट प्रथा पाळली पाहिजे असे कुणीच म्हणाले नाही. हे विशेष.
शासनाची भावना ही विकासोन्नतीचीच राहते त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील अनिष्ट चालीरीती नक्कीच कमी होतील. याचा विढा समाजातील सुशिक्षित जागरूक लोकांनी उचलायला हवा.